विषय - “शिक्षणातील AI तंत्रज्ञान आणि सामाजिक शास्त्रे”एक चिकित्सक अभ्यास

Authors

  • अनुराधा साहेबराव जाधव Author

DOI:

https://doi.org/10.62643/ijerst.2026.v22.i1(S).3097

Abstract

“शिक्षणात AI तंत्रज्ञान आणि सामाजिक शास्त्रे” या संशोधनाचा उद्देश शिक्षण प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सामाजिक शास्त्रांच्या अध्यापन-अभ्यास प्रक्रियेत होणारे बदल, संधी आणि आव्हाने यांचा समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास करणे हा आहे. डिजिटल युगात शिक्षण व्यवस्थेमध्ये तंत्रज्ञानाचा वाढता वापर दिसून येतो; विशेषतः AI आधारित साधने, वैयक्तिकृत शिक्षण (personalized learning), डेटा विश्लेषण, आभासी वर्ग (virtual classrooms) आणि स्वयंचलित मूल्यमापन प्रणाली यांमुळे सामाजिक शास्त्रांच्या अध्यापन पद्धतीत गुणात्मक बदल घडत आहेत. या संशोधनात मिश्र संशोधन पद्धती (Mixed Method) वापरून महाविद्यालयीन शिक्षक व विद्यार्थ्यांच्या अनुभवांचे विश्लेषण करण्यात येईल. प्रश्नावली, मुलाखती आणि निरीक्षण या साधनांद्वारे माहिती संकलित करून AI तंत्रज्ञानाचा अध्यापनातील प्रभाव, चिकित्सक विचारसरणीचा विकास, डिजिटल साक्षरता, तसेच सामाजिक असमानता व डिजिटल दरी (digital divide) यांसारख्या मुद्द्यांचा अभ्यास केला जाईल.

संशोधनातून अपेक्षित निष्कर्ष असे सूचित करतात की AI तंत्रज्ञानामुळे अध्यापन अधिक संवादात्मक, वैयक्तिकृत व परिणामकारक होत असले तरी नैतिकता, गोपनीयता, डेटा सुरक्षा आणि शिक्षकांची भूमिकांमध्ये होणारे बदल ही महत्त्वाची आव्हाने आहेत. सामाजिक शास्त्रांच्या संदर्भात AI चा वापर केवळ तांत्रिक नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक व नैतिक परिणामांच्या चौकटीतून समजून घेणे आवश्यक आहे.हा अभ्यास शिक्षण क्षेत्रातील धोरणनिर्मिती, अभ्यासक्रम विकास आणि शिक्षक प्रशिक्षणासाठी मार्गदर्शक ठरेल. 

Downloads

Published

21-03-2026

How to Cite

विषय - “शिक्षणातील AI तंत्रज्ञान आणि सामाजिक शास्त्रे”एक चिकित्सक अभ्यास. (2026). International Journal of Engineering Research and Science & Technology, 22(1(S), 425-433. https://doi.org/10.62643/ijerst.2026.v22.i1(S).3097